उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावातील डॉ.परशुराम खुणे यांनी लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ५ एप्रिल ला देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खुणे यांनी नक्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामाजिक कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली.बाल कलाकार ते वयाच्या ७० वर्षापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीत मागील पाच दशके कलागुणांतुन समाज परिवर्तनाचे धडे देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
नाट्यसृष्टीतील तसेच समाजसेवेतील योगदानाबद्दल त्यांना जादूगार सुनिल भावसार स्मृती पुरस्कार, श्यामराव बापू प्रतिष्ठान तर्फे कलागौरव पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार व शेती निष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी गुरनोली गावाची १५ वर्षे सरपंच म्हणून जनसेवा केली आहे.कार्याची दखल घेत खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरान्वीत केले.