Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजरामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेकडो भुमिपुत्रांची देसाईगंजच्या उपविभागिय कार्यालयावर धडक - शेतकऱ्यांच्या मागण्या मंजुर...

रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेकडो भुमिपुत्रांची देसाईगंजच्या उपविभागिय कार्यालयावर धडक – शेतकऱ्यांच्या मागण्या मंजुर होईपर्यत श्याम मस्के पाटलांचे उपोषण सुरु….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- मागिल १५ दिवसांपुर्वी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला सुरळित पाणिपुरवठा व्हावा; यासाठी महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे १२ तास कृषी पंपांना विजपुरवठ्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे ते पुर्ण करावे; यासाठी देसाईगंज तालुक्यातिल कृषी पंपधारकांनी आंदोलन उभारले होते.तेव्हा स्थानिक आमदारांनी चर्चा करुन ३ दिवसात आरमोरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यातिल शेतकऱ्यांना सुरळित विज पुरवठा केला जाईल,अशी ग्वाही दिली.परंतु तब्बल १५ दिवस उलटुनही विजपुरवठा होत नसल्याने पिक धोक्यात आल्याने शेकडो भुमिपुत्रांनी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या उपविभागिय कार्यालयावर मोर्चा च्या माध्यमातुन धडक दिली.शेतकऱ्यांच्या  मागण्या पुर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाची सुरुवात कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी केली.    निसर्गाशी नेहमिच दोन हात करित शेतकरी शेतात पिक उभारत असतो.आपल्या कुटुंबाच्या पोटाची खडगी भागविण्यासाठी कधी तुडतुडा,कधी रानटी जनावरांच्या हैदोषांवर मात करत शेतकरी शेतात पिक उभे करतो,कालव्याच्या सिंचनाची सोय नसलेले शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातुन रब्बी पिकाची लागवड करतात, मागिल दोन वर्षापासुन देसाईगंज तालुक्यात कृषिपंपांना विजपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला असुन सुरळित पाणिपुरवठा होत नसल्याने धान पिक धोक्यात येवुन करपण्याच्या मार्गावर लागले आहे.या समस्यांवर तोडगा निघावा;  यासाठी १५ दिवसापुर्वी रामदास मसराम यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेवुन देसाईगंज च्या विद्युत विभागाच्या कार्यालयाला घेराव केल्याने शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तथा उर्जामंञी देवेंन्द्र फडणविस यांच्याशी चर्चा करुन तिन दिवसात संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातिल कृषीपंपधारक शेतकर्यांना १२ तास सुरळित विजपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली. माञ १५ दिवस उलटुनही विद्युत विभागाकडुन कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.सद्या रब्बी पिकांच्या रोवणी चे काम जोरात सुरु असुन कृषिपंपधारक शेतकर्यांच्या शेतात  भेगा पडल्या असुन धान पिक धोक्यात आल्याने भुमिपुञ असलेल्या रामदास मसराम यांच्या नेतृत्वात चोप,कोरेगांव,बोळधा, शंकरपुर, विहिरगांव, किन्हाळा, मोहटोला आणि देसाईगंज तालुक्यातिल सर्वच कृषिपंपधारक शेकडो  शेतकऱ्यांनी उपविभागिय कार्यालयावर मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन उभारले आहे. एवढेच नव्हे तर कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी कार्यालयाच्या सामोर शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे शासनासमोर आव्हान उभे करुन आजपासुनच आमरण उपोषनाला सुरुवात केली आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या👇

निवेदन सादर करतांना रामदास मसराम म्हणाले की, उर्जा मंञ्यांनी दिलेल्या १२ तास कृषी पंपांना सुरळित विद्युत पुरवठ्याच्या आश्वासना नुसारच शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली १५ दिवस उलटुनही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शासन व प्रशासन गांभिर्याने विचार करत नाही, पिक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल होईल, आत्महत्तेचे प्रमाण वाढतिल, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणिंचा सामना करावा लागेल यासाठी उपाययोजना म्हनुण शेतकऱ्यांना २४ तास विजपुरवठ्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी, शासकिय धान खरेदी केन्द्रावर हेक्टरी ५० क्विंटल धान शेतकर्यांकडुन खरेदी करण्यात यावा, आधारभुत धान खरेदी ३५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामिण भागात विज पुरवठा करणाऱ्या शंकरपुर पॉवर ट्रान्सफार्मर वर ५ एमव्हिए ऐवजी १५ एमव्हिए चा ट्रान्सफार्मर लावण्यात यावा या सर्व मागण्या पुर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हनुण कोरेगांव चे श्याम मस्के पाटिल यांनी आमरण उपोषण सुरु केले.शासन व प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा शेतकऱ्यांच्या संयमाचा सत्ताधाऱ्यानी अंत पाहु नये असा सज्जड इशारा या प्रसंगी रामदास मसराम यांनी दिला.

या प्रसंगी विलास बन्सोड, लिलाधर पर्वते, कमलेश बारस्कर, शुभम नागपुरकर, परशुराम ठाकरे, प्रमोद पञे, दिनेश बेद्रे, हिराजी बुल्ले, विवेक केळझरकर, गरिबदास बाटबर्वे, महेश भरणे, होमराज डोंगरवार, होमराज गायकवाड यांचोसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!