उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमधील दुर्गम गावातील निवडून आलेल्या महिला सरपंचाला अयोग्य कारणांसाठी काढून टाकल्याबद्दल राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की,राज्य सरकारला सरपंचाने भिकेचा कटोरा घेऊन बाबूंसमोर (नोकरशहा) जावे असे वाटते का?. जशपूर जिल्ह्यातील एका गावातील महिला सरपंच सोनम लकडा यांच्या मानसिक छळाबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे; जो चार आठवड्यांत भरायचा आहे.खंडपीठाने म्हटले आहे की,छत्तीसगडमधील दुर्गम भागात आपल्या गावाची सेवा करण्याचा विचार करणाऱ्या एका निवडून आलेल्या सरपंचाला,तरुणीला काढून टाकण्यात अधिकाऱ्यांची मनमानी कारणीभूत आहे. त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक करण्याऐवजी किंवा त्यांना सहकार्य करण्याऐवजी किंवा गावाच्या विकासासाठी त्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्याऐवजी त्यांना अन्यायकारक वागणूक देण्यात आली हे चुकीचे आहे; असे खंडपीठाने म्हटले आहे.
राज्य सरकारला सरपंचाने भिकेचा कटोरा घेऊन बाबूंसमोर जावे असे वाटते का?… – सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एक लाख रुपयांचा ठोठावला दंड…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES