उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील आंगण ढाबा येथे विना परवानगीने दारू पिणे सुरू होते.सदर ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारास धाड घालून २२ जणांना दारू पिताना रंगेहात पकडण्यात आले.
गोंदियाच्या बार असोसिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.आंगण ढाबा येथे काही जण विनापरवानगी दारू पित असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने,राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिस अधीक्षक डॉ.मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक डी.बी.काळेल,दुय्यम निरीक्षक गायकवाड,सहायक फौजदार तराटे,जवान डिब्बे, बन्सोड, वाहन चालक भोंडे यांनी २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास धाड घालून त्या ढाब्यात दारू पित असलेल्या २२ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून दारू,बीयर,ग्लास,टेबल,खुर्ची जप्त करण्यात आली.
आरोपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८, ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सर्व ढाब्यावर सुरु आहे प्रकार
जिल्ह्यातील गोदिया-तिरोडा,गोंदिया-बालाघाट, गोदिया-आमगाव,गोंदिया-कोहमारा,रायपूर-नागपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत.या धाब्यावर सर्रासपणे ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे, पण खुद्द बार चालकांनाच याचा फटका बसू लागल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे याची तक्रार केली. या तक्रारीनंतर ही धाड टाकण्यात आली.तोपर्यंत हा सर्व प्रकार बिनधास्तपणे सरु होता.