उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.तर नागपूर,वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.आज अकोल्यात ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात ४१.८ अंश सेल्सिअस वर नोंदवले गेले आहे.उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रही चांगला तापला आहे.हवामान विभागाच्या विशेष तापमान अहवालानुसार,कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या विभागांमध्ये तापमान सामान्य होऊन अधिक नोंदवले गेले आहे. सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४० अंश सेल्सिअस वर होते.विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाच्या विशेष तापमान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES