- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सत्ता पालट तर अधिकारीही पालट होणे साहजिकच आहे.त्याचा तो अधिकारी व माझा हा अधिकारी अशी वर्तमानस्थिती झाली आहे.त्यामुळे याला कुठलाही तोड नाहीच,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशातच आता राज्यातील सहा आयएएस(सनदी अधिकार) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.बदल्यांचे सत्र हा न संपणारा विषय असल्याने आज,मंगळवारी १८ मार्चला गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा उपविभागीय अधिकारी रणजित मोहन यादव यांना प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प( ITDP)गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.रणजित यादव हे २०२२ मधील आयएएस अधिकारी आहेत.
मीनल करनवाल –मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
अंकित – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.हे २०१९ मधील आयएएस अधिकारी आहेत.
आंचल गोयल – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर यांची मुंबई शहर मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१४ मधील आयएएस अधिकारी आहेत.
कवली मेघना – प्रकल्प संचालक आयटीडीपी,किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग नांदेड यांची जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१९ आयएएस अधिकारी आहेत.
करिश्मा नायर – प्रकल्प संचालक,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP)जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग पालघर यांची नाशिक महानगरपालिका नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०२१ मधील आयएएस अधिकारी आहेत.
- Advertisement -

