Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे २...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे २ हजार रुपये येणार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी नुकतेच राज्य शासनाने १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली होती.त्यासंदर्भात तसा शासन निर्णयही काढला होता.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे.यापूर्वी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो  शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे २ हजार रुपये ३१ मार्च २०२५ रोजी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे(डीबीटी)जमा करण्यात आले होते.अश्यातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज,मंगळवार ९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे २ हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!