Monday, September 14, 2026
Homeनागपूरराज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय समितीसमोर मांडण्याची संधी..

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय समितीसमोर मांडण्याची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी नागपूर महसूल विभागातील विविध घटकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.या प्रक्रियेत विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक,शिक्षक,शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना व शिफारशी सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षांच्या विद्यमान पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन त्या अधिक सक्षम करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी,उमेदवार,शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित हितधारकांशी संवाद साधून त्यांच्याकडून सूचना,शिफारशी,हरकती व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य येत्या, बुधवार १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन,सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स,नागपूर येथे भेट देऊन संबंधितांशी संवाद साधणार आहेत.
नागपूर महसूल विभागातील नागरिक व संबंधित घटकांकडून अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.हा कक्ष ९ सप्टेंबरपासून सुरू असून उद्या,मंगळवार १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
सूचना व अभिप्राय प्रत्यक्ष सादर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय,नागपूर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नागरिकांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे प्रत्यक्ष अभिप्राय सादर करता येईल.
प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांना nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपले लेखी अभिप्राय,सूचना व शिफारशी पाठविता येतील.
राज्य शासनाचे विविध विभाग,प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या विद्यमान परीक्षा पद्धती आणि कार्यपद्धतीचा आढावा;परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना; प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन,डिजिटल अथवा मुद्रित वितरण,गोपनीय वाहतूक,परीक्षा केंद्र व्यवस्थापन,प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन आणि निकाल प्रक्रियेतील सुरक्षितता या बाबींवर सूचना अपेक्षित आहेत.
त्याचप्रमाणे डिजिटल प्रणाली,बायोमेट्रिक प्रमाणीकरण,प्रवेश नियंत्रण,ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेखीचा प्रभावी वापर; पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग,तोतया उमेदवार,संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय; गैरप्रकारांबाबत उत्तरदायित्व निश्चित करणे; तसेच इतर राज्ये अथवा देशांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आधुनिक व सुरक्षित परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून राज्यात उपयुक्त पद्धती लागू करण्याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रांच्या निवडीसाठी आवश्यक किमान मानके,पायाभूत सुविधा,सुरक्षितता,मनुष्यबळ व कार्यसज्जता; जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्था यांच्यात प्रभावी समन्वयाची चौकट तसेच उमेदवारांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याबाबतही नागरिकांना सूचना करता येणार आहेत.
प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणांसंदर्भातील सर्वसमावेशक अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.
सध्या मोठ्या संख्येने युवक विविध शासकीय भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून परीक्षा पद्धतीतील अडचणी तसेच आवश्यक सुधारणांबाबत महत्त्वपूर्ण सूचना पुढे येऊ शकतात.त्यामुळे विविध जिल्ह्यातील विद्यार्थी, परीक्षार्थी,पालक,शिक्षक,अभ्यासिका व कोचिंग क्लासेसचे संचालक,शैक्षणिक संस्था,लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी या संधीचा उपयोग करून विहित मुदतीत विधायक आणि ठोस सूचना सादर कराव्यात, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!