Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे खरे कारण आले समोर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे कपात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.पण,सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेसाठी निधी कमी पडलेला नाही. योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीनंतर पात्र ठरलेल्या कोट्यवधी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे नियमितपणे जमा होत आहेत.त्यामुळे योजना बंद झालेली नाही किंवा आर्थिक टंचाईमुळे त्यात कपात केलेली नाही.त्यातच,८० लाख महिलांची नावे आर्थिक संकटामुळे वगळली गेलेली नाहीत,तर कागदपत्रांमधील त्रुटी आणि अपात्रतेमुळे त्यांचे अर्ज बाद झाले आहेत.पात्र महिलांसाठी ही योजना पूर्ववत सुरू आहे.याबाबत राज्य सरकारच्या डीजीआयपीआर(DGIPR)या एक्स(ट्विटर)हँडलवर लाडकी बहीण योजनेवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थ्यांची नावे राज्यावरील आर्थिक संकटामुळे वगळण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सांगण्यात आले आहे.लाभार्थ्यांची संख्या कमी होण्यामागे अनिवार्य ई-केवायसी पडताळणी आणि पात्रता तपासणी प्रक्रिया कारणीभूत असून योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही प्रस्ताव नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.योजनेतून ८० लाख महिलांना अचानक काढून टाकलेले नाही.सरकारने जेव्हा अर्जांची छाननी केली,तेव्हा सुमारे ८० लाख अर्ज अपात्र आढळले.त्याची कारणेही समोर आली आहेत.विशेष म्हणजे,एकाच महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांचा किंवा मोबाईल नंबरचा वापर करून एकापेक्षा जास्त अर्ज भरणे.चारकी वाहन असूनही खोटी माहिती देणे. अर्जदाराचे वय २१ ते ६५ वर्षांच्या मर्यादेत नसणे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणे.तसेच बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे किंवा थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया सक्रिय नसणे. सदरची कारणे अपात्रतेस कारणीभूत असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळेच राज्यातील तब्बल ८० लाख लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!