- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा होमगार्डतर्फे होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ४.३० ते ११ वाजेच्या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे बोलाविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली,आरमोरी,देसाईगंज,चामोर्शी, अहेरी,सिरोंचा या पथकातील पुरुष व महिला उमेदवारांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी करीता येतांना ज्यांनी अर्ज जमा केला नाही; त्यांनी सोबत अर्ज आणावा.एन.सी.सी.बी. व सी.प्रमाणपत्र, आय.टी.आय.प्रमाणपत्र,जिल्हा स्तरीय क्रीडा प्राविण्य प्राप्त,जडवाहन चालक परवाना व इतर तपशिलाच्या सर्व संबंधित मुळ प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो नोंदणीचे वेळी सादर करायचे आहेत.
उमेदवारांने शारिरीक क्षमता चाचणी मध्ये पात्र होणे करिता ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील (धावणे या प्रकारात किमान १० गुण व गोळाफेक या प्रकारात किमान ४ गुण आवश्यक राहील).होमगर्ड नोंदणी प्रक्रिया पारदर्शक राहणार असुन उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडु नये तसेच शिफारस/वशिला इ.गैरमार्गाचा वापर करु नये; होमगार्ड नोंदणी करिता कोणी पैसे/लाचेची मागणी केल्यास तात्काळ अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली व अधिक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय गडचिरोली यांचेकडे तक्रार करावी.अतिवृष्टीमुळे वेळापत्रकात बदल झाल्यास त्याची सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल.त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सुचनांचे अवलोकन करावे; असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक एम.रमेश यांनी कळविले आहे.
- Advertisement -

