Tuesday, September 15, 2026
Homeगडचिरोलीयेत्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.. - समस्याग्रस्त व पीडित महिलांना...

येत्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.. – समस्याग्रस्त व पीडित महिलांना वैयक्तिक तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या,सोमवार १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या वैयक्तिक तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विविध विभागांशी संबंधित वैयक्तिक तक्रारींचे लेखी अर्ज स्वीकारण्यात येतील.
अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सादर करावेत.महिला लोकशाही दिनासाठीचा विहित अर्ज नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,बॅरेक क्र.१,खोली क्र.२६ व २७,कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे नि:शुल्क उपलब्ध आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरणे,सेवा व आस्थापना विषयक बाबी तसेच विहित नमुन्यात नसलेले अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.जिल्ह्यातील सर्व पीडित व समस्याग्रस्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीजेमुळे सार्वजनिक शांततेचा भंग; तब्बल १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बेकायदेशीररीत्या डीजे व साऊंड सिस्टीम वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग व प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या डीजे मालक व ऑपरेटर आणि चालक यांच्यावर...

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!