Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीयुवक व महिलांना रोजगारासाठी ‘मॅजिक बस’चे प्रशिक्षण व मार्गदर्शन..

युवक व महिलांना रोजगारासाठी ‘मॅजिक बस’चे प्रशिक्षण व मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व वनालगतच्या भागातील युवक-युवती आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व अहेरी येथील दुर्गम भागात ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘लाइव्हलीहूड रिसोर्स सेंटर’ मॉडेल प्रभावीपणे राबवले जात आहे.या उपक्रमात कौशल्य प्रशिक्षण,करिअर समुपदेशन आणि रोजगाराशी जोडणी यावर भर देण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचविण्यासाठी स्थानिक गरजा आणि उपलब्ध रोजगार व व्यवसायाच्या संधींचा अभ्यास करून प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येते.प्राथमिक संवाद साधण्यापासून त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईपर्यंत सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा करणे,हे या उपक्रमाच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे.
नोकरी करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना करिअर समुपदेशन,कौशल्य विकास आणि कंपन्या व उद्योगांशी जोडणीसाठी मदत केली जाते.नोकरी मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येते.
कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे घरापासून दूर जाऊन काम करणे शक्य नसलेल्या युवक व महिलांसाठी स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी विकसित करण्यावर भर दिला जातो. यासाठी आवश्यक कौशल्ये,भांडवलाशी जोडणी आणि बाजारपेठ मिळविण्यासाठी साहाय्य केले जाते. विशेषतः महिलांना व्यवसाय नियोजन,आर्थिक साहाय्याशी जोडणी आणि व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते.
स्थानिक प्रशासन व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या समन्वयातून उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना रोजगार मिळाला आहे का,त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का आणि ते नोकरी अथवा व्यवसायात टिकून आहेत का,याचाही नियमित पाठपुरावा केला जातो.
याबाबत अधिक माहितीसाठी अहेरी केंद्राच्या व्यवस्थापक स्नेहा भानारकर यांच्याशी मोबाईल क्रमांक-९०६७९३५४१८,तसेच धानोरा केंद्राचे व्यवस्थापक अमोल यादव यांच्याशी मोबाईल क्रमांक- ९५०३००६७०८ यावर संपर्क साधता येईल,असे कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!