- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे “Extremely Severe Alert” म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर सूचना म्हणून प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज,मंगळवार २६ मे रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी प्राप्त झालेल्या संदेशात “पुढील २४ तासांत अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,वर्धा या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी रात्र उष्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.गेल्या आठवडाभरापासून सूर्यदेव विदर्भावर कोपल्याचे चित्र आहे.११ पैकी ९ जिल्ह्यांतील नागरिक उष्ण लाटेचा सामना करीत असून उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पुढे आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरीत काल सोमवारी पारा ०.४ अंशाने वाढून ४७.६ अंशावर पोहोचला असून सलग दुसऱ्याही दिवशी हे शहर देशात सर्वात तापदायक ठरले आहे. नागपूर व इतर पाच जिल्ह्यांत दिवसाचे तापमान ४६ अंशाच्यावर नोंदविण्यात आले.सोमवारी नागपूरचा पारा १.१ अंशाने वाढून थेट ४६.५ अंशावर उसळला असून ब्रम्हपुरीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे.याशिवाय भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा शहरांचे तापमानही एकपेक्षा अधिक अंशाने वाढून ४६ अंशापेक्षा अधिक नोंदविण्यात आले आहे.दुसरीकडे अकोला, अमरावतीचा ४५ अंशाच्यावर आणि यवतमाळ ४४.४ अंशावर असून उष्ण लाटेच्या प्रभावात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये,पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

