Monday, September 21, 2026
Homeनागपूरमोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल उचलतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलीच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने वडिलांनी दहावीत शिकणाऱ्या मुलीकडील मोबाइल काढून घेतला.याचा राग आल्याने मुलीने मध्यरात्री घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भूमिका कोलचलीवार वय १५ वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. भूमिका ही मोबाइलच्या आहारी गेली होती.सतत मोबाइलमध्ये व्यस्त राहत असल्याने तिच्या शिक्षणावर परिणाम होईल,अशी चिंता पालकांना सतावू लागली.मोबाइलच्या अतिवापरामुळे पालक तिला वेळोवेळी समज देत होते.रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले.भूमिकाची आई घरातील दुसऱ्या खोलीत झोपली होती.दरम्यान,पहाटे सुमारे तीन वाजता तिला जाग आली.भूमिका दिसत नसल्याने आईने तिचा शोध घेतला.तिने समोरच्या खोलीत पाहिले असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली.भूमिकाला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून आईने टाहो फोडला.कुटुंबीयांनी भूमिकाला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती हुडकेश्वर पोलीस प्रशासनास मिळताच  पोलिसांनी घटनेची नोंद केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!