Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी ४६ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - देसाईगंज शहरातील...

मोठी बातमी ४६ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या – देसाईगंज शहरातील आज दुपारची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली): देसाईगंज शहराच्या गांधी वार्ड येथे एका ४६ वर्षीय इसमाने स्वतःच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज, रविवार १५ डिसेंबरच्या दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.उमेश महादेव सिंगाडे वय ४६ वर्षे,रा.गांधी वार्ड देसाईगंज,ता.देसाईगंज असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,उमेश सिंगाडे यांचे देसाईगंज शहराच्या ब्रम्हपुरी मार्गावर गांधी वार्ड या ठिकाणी आशापुरा फर्निचर मार्टचे दुकान आहे.सिंगाडे हे
रविवारला दुकान बंद ठेवून कारागिरांची साप्ताहिक मजुरी अदा करीत असतात.त्यानुसार आज रविवारी उमेश सिंगाडे हे कारागिरांची साप्ताहिक मजुरी अदा करण्यासाठी दुकानात गेले व मजुरांची मजुरी अदा केली.मात्र,बराच वेळ होऊनही उमेश सिंगाडे हे घरी न परतल्याने त्यांच्या आई दुकानाकडे गेल्या.दुकानाचे दार उघडे असल्याने त्यांनी आवाज दिला,आवाज देत  आतमध्ये गेल्या असता उमेश सिंगाडे हे नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दुकानात दिसून आले.त्यातच त्यांनी ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.उमेश सिंगाडे यांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला त्या ठिकाणी जवळच सिडी दिसून येत आहे; मात्र,त्यांनी गळफास लावून आत्महत्या कां केली हे अद्याप कळू शकले नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!