उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्ह्यात आज,रविवारी सकाळच्या सुमारास नॅशनल पार्क परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळताच माहितीच्या आधारे माओवाद्यांच्या मुख्य भागात ऑपरेशनसाठी सैनिकांना बाहेर काढण्यात आले.जवान घटनास्थळी पोहोचताच नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.यात सुरक्षा दलाने तीन नक्षलवाद्यांना ठार केले असून घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. मधूनमधून गोळीबार सुरूच आहे. माडेड भागातील बांदेपारा भागात ही घटना घडली.आज सकाळपासून नॅशनल पार्क एरिया कमिटीच्या माओवाद्यांनी जवानांना घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.ठार झालेले नक्षलवादी डीव्हीसीएम (विभागीय समिती सदस्य) केडरचे असल्याचे सांगण्यात येत आहे.छत्तीसगडमधील या कॅडरच्या नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचे बक्षीस आहे.
मोठी बातमी… सुरक्षा दलाकडून तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान; मधूनमधून गोळीबार सुरूच…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

