उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालपदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती.त्यामुळे त्यांच्या जागी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान,पंजाब निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.
विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांची २१९ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.या पदावरील त्यांची आतापर्यंतची कारर्किद वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.