Saturday, March 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी; -दोन ट्रेन धडकल्या एकमेकांवर; १५ ठार तर १०० जखमी…
spot_img

मोठी बातमी; -दोन ट्रेन धडकल्या एकमेकांवर; १५ ठार तर १०० जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १५ जण ठार झाले असून,१०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत.मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.राजधानी ढाकापासून ८० किमी दूर भैरब येथे प्रवासी ट्रेनने एका मालगाडीला धडक दिली.दोन्ही ट्रेन वेगवेगळ्या दिशेने धावत होत्या.धडकेनंतर दोन्ही ट्रेन रुळावरुन खाली घसरल्या.दुर्घटनेनंतर प्रवाशांची एकच आरडाओरड सुरु झाली होती. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजूल इस्लाम यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.सरकारी अधिकाऱ्याने एफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार,आम्हाला १५ मृतदेह सापडले आहेत. अनेकजण जखमी असून आकडा वाढू शकतो. बचावकार्य सुरु असून यादरम्यान खाली दबलेले आणखी मृतदेह सापडू शकतात.यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने ही दुर्घटना झाल्याचे दिसून येत आहे.बांगलादेशात ट्रेन अपघात होणं ही आता सामान्य बाब झाली आहे. खराब सिग्नल, बेजबाबदारपणा, जुने ट्रॅक आणि खराब पायाभूत सुविधा यामुळे या दुर्घटना होत असतात.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!