Tuesday, April 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी.. आज ९ महिला नक्षलवाद्यांसह १४ पुरुष नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

मोठी बातमी.. आज ९ महिला नक्षलवाद्यांसह १४ पुरुष नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगड राज्याच्या नक्षली संघटनेला आज,शनिवार १२ जुलै रोजी मोठा धक्का बसला आहे.तब्बल ९ महिला नक्षलवाद्यांसह १४ पुरुष नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत अहिंसेचा मार्ग अवलंबून शासनाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण केले आहे.आत्मसमर्पण केलेल्या ११ नक्षलवाद्यांवर प्रत्येकी ८ लाख रुपये,४ नक्षलवाद्यांवर प्रत्येकी ५ लाख रुपये,एका नक्षलवाद्यावर ३ लाख रुपये तर ७ नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपये असे एकूण १ कोटी १८ लाख रुपयांचे बक्षीस शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.यातील ११ वरिष्ठ कॅडरचे नक्षलवादी असून,यापैकी बहुतांश नक्षली पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA)बटालियन क्रमांक-१ मध्ये कार्यरत होते.सदरची बटालियन नक्षलवाद चळवळीतील सर्वात शक्तिशाली आणि सक्रिय शाखा मानली जाते.या आत्मसमर्पणामुळे छत्तीसगडच्या सुकमा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील नक्षलवाद संघटना सुकडा साफ होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.तब्बल २३ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण सारख्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा दल,डीआरजी सुकमा,विशा सुकमा,रेंज फील्ड टीम (आरएफटी) सुकमा,जगदलपूर, सीआरपीएफ-२, २२३,२२७, २०४,१६५ बटालियन,कोब्रा बटालियन २०८ सह गुप्तचर शाखेच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!