Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,चामोर्शी शहरातील बाल विवाहास घातला आळा- बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व...

मोठी बातमी,चामोर्शी शहरातील बाल विवाहास घातला आळा- बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व पोलीस प्रशासन चामोर्शी यांची कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – जिल्ह्यातील चामोर्शी तालुका शहरामध्ये आज १० मार्च २०२३ रोजी बालविवाह होणार असल्याची गुपित माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना मिळताच लगेच त्यांनी सदर घटनेची माहिती गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांना दिली.जिल्हा बाल संरक्षण व पोलीस पथक यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाह स्थळास भेट देऊन बालविवाहास आळा घालण्यात आला.मुलाची व मुलीचे जन्म पुरावा तपासणी करून  बालीका १८ वर्षाखालील आणि मुलगा २१ वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व मुलाचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.

मुलीकडचे व मुलाकडचे दोन्ही मंडळी नागभिड तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते चामोर्शी शहरात फेब्रुवारी  महिन्यात रोजगाराच्या शोधात कामाकरिता (भटकंती जमात) आले होते. एक दिवसा आधी त्यांनी हळदीचा कार्यक्रम पार पाडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वधू व वरांकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत बालविवाह चामोर्शी येथे होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली असल्याने त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी सदर बालिकेच्या तात्पुरता स्वरूपात राहणाऱ्या ठिकाणी त्यांचे घर गाठून मुलीच्या आई वडिलांकडून मुलीचे १८ वर्ष व मुलाचे २१ वर्ष पूर्ण होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही.असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे व मुलाचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले  यांचे उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्या नुसार होणारी कारवाई बाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,  पोलीस स्टेशन चामोर्शीच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ,बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस जीवन हेडावू, सामाजीक कार्यकर्ते जयंत जथाडे,क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार यांनी कार्यवाही केली.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर १०९८  वर बाल विवाह बाबत संपर्क करावे;असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!