उद्रेक न्युज वृत्त
नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे आता भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन पायउतार होणार आहेत.पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत टिप्पणी केली.राष्ट्रपतींनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला.माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली.हा अत्यंत चांगला निर्णय आहे, यापूर्वीच तो झाला पाहिजे होता. महाराष्ट्राने आजवर अशी व्यक्ती कधी राज्यपाळ झालेली पाहिली नव्हती,ती आपण पाहिली. पण आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्याबाबत बदल केाल, ही समाधानाची बाब आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.आज रविवार लानागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात मन रमत नसल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देतानाही शरद पवार यांनी कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून गेले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आम्ही ऐकली आहे. आमच्याकडेही ठोस माहिती नाही.पण कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल, असे शरद पवार यांनी म्हटले होते.