- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यातील मंत्री खाते वाटप झालीत,मात्र काही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,बुधवारी २५ डिसेंबरला नागपुरातील पत्रकार परिषद घेतली.पत्रपरिषदेत बोलतांना फडणवीस म्हणाले की,पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील.ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल,त्यांनी मला बीडला जायला सांगितले तर मी बीडला देखील जाईल,किंवा त्यांनी जिथे जायला सांगितले तिथे जाईल.साधारणपणे मुख्यमंत्री कुठले पालकत्व ठेवत नसतात.पण माझी स्वतःची इच्छा आहे; गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो,अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन,असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काँग्रेसलाही लक्ष्य केले. झोपलेल्याला जागवले जाऊ शकते.मात्र झोपेचा सोंग घेणाऱ्याला जागवता येत नाही.काँग्रेसला माहित आहे की,ईव्हीएम टेम्परप्रुफ आहे,खरं तर या मशीन टेम्परींचे पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने त्यांना संधी दिली होती.मात्र, काँग्रेस सिद्ध करू शकले नाही.हे लोक निवडणूक हरले की ईव्हीएमला दोष देतात आणि जिंकले की तर लोकशाही जिंकली असे म्हणतात,अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- Advertisement -

