Friday, September 4, 2026
Homeमुंबईमुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; जनजीवन विस्कळित..!

मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; जनजीवन विस्कळित..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात पावसाने सर्वत्र धूम ठोकली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विविध जिल्ह्यात आभार फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अश्यातच कालपासून ते आज,सोमवार २६ मे रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढून मे महिन्यात मुंबईत १०७ वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडला आहे.आज सोमवारी सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजला आहे.सर्वत्र अंधार पसरलेला असून पावसाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत.मुंबईत मान्सूनने नवा विक्रम केला आहे.१६ दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला आहे.११ जूनला दाखल होणारा मान्सून यंदा आज २६ मे रोजी दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे.खबरदारी म्हणून एनडीआरएफ (NDRF)चे पथक  दाखल झाले आहे.मुंबईत तर पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे.मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली येथील नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झालेली आहे.पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.पुण्यात मे महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर,बारामती,दौंडला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.काल रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा कालवा फुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!