Tuesday, June 23, 2026
Homeलाखांदूरमानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी…-आई-वडिलांच्या चरण पुजेसह विध्यार्थ्यांना...

मानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी…-आई-वडिलांच्या चरण पुजेसह विध्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधुन काल,२१ जुलैला सकाळच्या सुमारास शालेय विद्यार्थी,अंगणवाडीतील बालके तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची चरण पूजा करून आगळी-वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ओम काढून करण्यात आली. गुरुपौर्णिमा दिनी विद्यार्थ्यांच्या आई-वडीलांना पाचारण करण्यात आले होते.आपल्या जीवनात सर्वप्रथम गुरू हे आई आणि वडील असल्याने प्रसंगी त्यांचे चरण मुलांनी स्वच्छ पाण्याने धुऊन अक्षदा व पुष्प वाटून चरणपुजा करण्यात आली.त्यानंतर सर्व अंगणवाडीतील चिमुकले तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी सुरज ब्राह्मणकर यांनी आपल्या जीवनात गुरूचे स्थान किती महत्वाचे असते; हे आपल्या भाषणातून पटवून सांगितले.आजपर्यंत कुठेही अशी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली नसल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.गावात व संपुर्ण देशाला आपली संस्कृती दाखविणारा आर्दश,वीर एकलव्य भोई समाज संघटना व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक आगळा-वेगळा कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दाखविला आहे.

विर एकलव्य भोई समाज संघटना मानेगाव (बोर) यांच्या सौजन्याने पकंज तंतरपाळे संस्थापक अध्यक्ष  अजितदादा पवार सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने सर्व अंगणवाडी व शाळेतील मुलांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.अमोल विश्वासराव उके कार्याध्यक्ष अजितदादा पवार सोशल फाऊंडेशन  यांनीही सहकार्य केले.कार्यक्रमाचे आयोजन मुन्नेश्वर कांबळे जिल्हाध्यक्ष अजित पवार सोशल फाऊंडेशन भंडारा,वीर धनुर्धर एकलव्य भोई समाज संघटना मानेगांव बोर येथील अध्यक्ष मुरलीधर मेश्राम,सचिव प्रेमलाल मेश्राम,शंभु मेश्राम,निताराम मेश्राम,प्रशांत शहारे,तुळशीदास शहारे,भिवा मेश्राम,प्रतिक मेश्राम,नरेंद्र मेश्राम,रुपचंद मेश्राम,शंकर मेश्राम,नाना मेश्राम,अजय कांबळे,प्रदिप मेश्राम,किशोर शिंदे,शेषराव शहारे,जि.प.प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक एच.एम.दोनाकोंडा,रणदिवे,शाळा व्य. समिती अध्यक्ष विनोद चुके,उपाध्यक्ष विद्या भांडारकर तसेच सदस्यगण यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.       

सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील पोलीस पाटील विजय भेंडारकर,सतिश रंगारी,प्रशांत लंजे,धनंजय फुंडे,शंकर डोंगरे,डोमा कुळमते,संगिता शहारे,नितिन देशपांडे, अंगणवाडी सेविका वैशाली चुटे,शितल डोंगरे,प्रिती सोनपिंपळे,पुजा कठाणे,प्रतिभा सोनपिंपळे,अमरदास भेंडारकर,शत्रुघ्न भेंडारकर,लिला कांबळे,नलु भेंडारकर,राधा मेश्राम,सुषमा कांबळे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!