- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी काल,सोमवारी रात्री दगडफेक केली असून, या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले आहेत. काटोल रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना रात्रीच नागपूरला हलविण्यात आले.नागपुरातील नरखेड येथे सांगता सभा आटोपून देशमुख हे काटोल येथे जात होते.त्यावेळी जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.हा हल्ला नेमका कुणी केला? आणि हल्ल्यामागचे कारण काय? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.मात्र,या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा देशमुख यांनी आरोप केला आहे.
- Advertisement -