Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीमागितले १ लाख घेतले ७० हजार; कुरखेडा भुमी अभिलेख कार्यालयाचा मुख्यालय सहाय्यक...

मागितले १ लाख घेतले ७० हजार; कुरखेडा भुमी अभिलेख कार्यालयाचा मुख्यालय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा येथील भुमी अभिलेख कार्यालयात मुख्यालय सहाय्यक पदावर कार्यरत वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यास ७० हजाराची लाच घेतांना गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल,बुधवार ६ ऑगस्ट रोजी  रंगेहाथ अटक केली.रवींद्र सदाशिव दिनकोंडावार,वय ४२ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून कुरखेडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करताच त्याच्या राहत्या घराचीही झडती घेण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,भुमी अभिलेख कार्यालय कुरखेडा येथील मुख्यालय सहाय्यक रवींद्र दिनकोंडावार यांनी तक्रारदारास शेतजमिनीचा पोटहीस्सा मोजणी व सातबारा वेगळा करून चालन काढुन देण्याचे कामाकरीता १ लाख रुपयांची मागणी केली.तक्रारदारास आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.सदर तकार प्राप्त झाल्यानंतर मंगळवार ५ ऑगस्ट २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली.रवींद्र दिनकोंडावार यांनी सुरुवातीला १ लाख रुपये मागितले व तडजोडी अंती ७० हजार रुपये स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून काल,६ ऑगस्ट रोजी रंगेहाथ अटक केली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सागर कवडे, ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर,सचिन कदम अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी.ढोले यांचे पर्यवेक्षणात पो.नि.संतोष पाटील,सफौ सुनील पेददीवार,पोहवा राजेश पदमगिरीवार,किशोर जौजांरकर,स्वप्नील बांबोळे,पो.अं.संदीप उडान,संदिप घोरमोडे,प्रविण जुमनाके,हितेश जेटटीवार,मपोअं/ विद्या मशाखेत्री,जोत्सना वसाके व चापोहवा / राजेश्वर कुमरे, चापोशि/चापले सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली.
  • संपर्क साधण्याचे आवाहन👇
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली यांचेशी सपंर्क साधावे,असे आवाहन पोलीस उपधिक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.
पोलीस उप-अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालय गडचिरोली,दुरध्वनी क्रमांक – ०७१२-२९५०२०
टोल फ्रि क्रमांक- १०६४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!