- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.या समस्येकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा महासचिव रविंद्र गोटेफोडे यांनी तातडीने चेंबर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
२२ मीटर रुंदीच्या महामार्गाच्या कामामुळे पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले सार्वजनिक नळयोजनेचे तीन खोल चेंबर आता महामार्गाच्या मध्यभागी आले आहेत.सध्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असल्याने चेंबरवरील लोखंडी पत्रे तुटून वाहने खड्ड्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वीच संबंधित चेंबर सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक होते.मात्र,तसे न करता बांधकाम सुरू करण्यात आल्याने अपघाताबरोबरच शहराच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चेंबरचे स्थलांतर होईपर्यंत त्या भागातून वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचे नियोजन करावे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी रविंद्र गोटेफोडे यांनी महामार्ग विभागाकडे केली आहे.
- Advertisement -

