Monday, May 25, 2026
Homeमुंबईमहानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा.. - येत्या १६ जानेवारीला निकाल घोषित..

महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा.. – येत्या १६ जानेवारीला निकाल घोषित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्य निवडणूक आयोगाने आज,सोमवार १५ डिसेंबरला राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुंबईच्या मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, येत्या २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल.त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल.२ जानेवारी २०२६ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल,तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल.त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान,तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी मत मोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका मागील सात ते आठ वर्षांपासून किंवा त्याहून अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात,असे न्यायालयाने स्पष्ट केले असले तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!