Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीमराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- न्यायाधीश वसंत कुलकर्णी

मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- न्यायाधीश वसंत कुलकर्णी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर,तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा,असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा.कुलकर्णी यांनी केले.गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक-३०६ मध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.न्या.कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले,तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी.सदाफळे,दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी.रघुवंशी,सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले.प्रा.डॉ.नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या.कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध,श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु.ल.देशपांडे,वि.वा. शिरवाडकर,संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला.मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा,असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे.शेंडे यांनी परिश्रम घेतले.सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!