Sunday, October 4, 2026
Homeगडचिरोलीमधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना मिळणार 'मधुमित्र व मधुसखी' पुरस्कार.....

मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना मिळणार ‘मधुमित्र व मधुसखी’ पुरस्कार.. -अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरु झाली आहे.मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे.मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम,द्वितीय व तृतीय पुरस्काराने या पुरस्कार योजनेत सन्मानित करण्यात येते.यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे.पुरस्काराचे स्वरूप प्रथम पुरस्कार ११ हजार रुपये,द्वितीय ७ हजार रुपये व  तृतीय पुरस्कार ५ हजार रुपये,असे आहे.
२० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.या पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील.इच्छुकांनी आपले नामांकन येत्या,४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावे.असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.
 अधिक माहितीसाठी संपर्क :
१.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,जिल्हा कार्यालय/संपर्क क्र.8459160604
 २.संचालक,मध संचालनालय,महाबळेश्वर/फोन नं. 02168-260264
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!