Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमंगळवारी यूपीएससीचा निकाल; तरीही 'तो' मामांच्या मेंढ्या-बकऱ्या राखत होता.. - मेंढ्या राखणाऱ्याचा...

मंगळवारी यूपीएससीचा निकाल; तरीही ‘तो’ मामांच्या मेंढ्या-बकऱ्या राखत होता.. – मेंढ्या राखणाऱ्याचा मुलगा बनला आयपीएस अधिकारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ एप्रिल रोजी २०२४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.२०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी देशभरातून लाखो गुणवंत विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत घेऊन आपले नशीब आजमावू पाहत होते.देशपातळीवर सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत बिरदेव डोणे याचा परीक्षेतील बैठक क्रमांक-६६ लाख ७ हजार ९२५ इतका होता. यावरून ही स्पर्धा परीक्षा किती आव्हानात्मक व महत्त्वाची असते हे समजते,तर या परीक्षेत पहिल्या हजारात येणे हे काय दिव्य असते आणि त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे बिरदेवच्या यशावरून दिसते.
बिरदेव डोणे👇
प्रयत्न आणि चिकाटीतून यशाला गवसणी घालता येते,हे ग्रामीण भागातल्या मुलांना निश्चितच प्रेरणादायी आहे.स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना आपली संगत ही चांगल्या मित्रांसमवेत असली पाहिजे.मुलांनी व्यसनापासून लांब राहिले पाहिजे.परिस्थितीची जाणीव असावी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे.आई-वडील शिकले नाहीत,मात्र मला कष्टाने शिकविले.आज त्यांचे पांग फेडल्याचे समाधान मिळाले आहे.मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.

वडील मेंढपाळ,घरात कुणीही शिकलेले नाही,पण तरीही बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने एक स्वप्न पाहिले आणि मोठ्या संघर्षातून ते सत्यात उतरवले.बिरदेवने  यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून देशभरात त्याने ५५१ वी रँक मिळवली.मेंढ्या हाकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात देऊन आता आयपीएस होईल.कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव डोणेने संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी आहे.मंगळवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला.त्या वेळी बिरदेव बेळगाव येथे मामांच्या मेंढ्या-बकऱ्यांच्या कळपात होता.बिरदेवचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुरुड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्याच्या जन्मगावी झाले.दहावीच्या परीक्षेत त्याला ९६ टक्के गुण मिळाले.मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे २०१६ मध्ये १२ वी विज्ञान शाखेतून ८९ टक्के गुण मिळवीत तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता.कोणत्याही खासगी क्लासशिवाय त्याने सीईटी परीक्षेत राज्यस्तरावर ७ वी रँक मिळवली होती.त्यातून त्याला पुणे येथील सीईओपी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळाला.अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी) परीक्षा तयारीसाठी त्याने दोन वर्षे दिल्लीत सराव केला.दोन्ही प्रयत्नांत यश न मिळाल्याने पुणे येथे अभ्यासाची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नातच त्याने देशपातळीवर ५५१ वे स्थान पटकावले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!