- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने शासन आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ मधील तरतूदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने,भारतीय वन सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना करण्यात येत असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार, चंद्रपूर,यवतमाळ,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर व चिखलदरा वनवृत्तास नव्याने पाच सहाय्यक वनसंरक्षक(एसीएफ)मिळाले आहेत.
१. प्रांजल प्रमोद चोपडे,सवसं(अधिसंख्य पद)उपवसं (प्रा.),अमरावती,अमरावती वनवृत्त यांची सहाय्यक वनसंरक्षक(तांत्रिक),चंद्रपूर वनवृत्त,चंद्रपूर येथे पदस्थापना.
२. इंगिलाला मुरलि क्रिष्णा,सवसं (अधिसंख्य पद)- उपवसं (प्रा.),गडचिरोली,गडचिरोली वनवृत्त यांची
सहाय्यक वनसंरक्षक(जंकास),यवतमाळ वन विभाग, यवतमाळ येथे पदस्थापना.
३. राहुलगौडा आर.,सवसं (अधिसंख्य पद) उपवसं (प्रा.),आलापल्ली,गडचिरोली वनवृत्त यांची सहायक वनसंरक्षक(सांख्यिकी),कोल्हापूर वनवृत्त,कोल्हापूर येथे पदस्थापना.
४. लोकेश मनोहर पाटील,सवसं (अधिसंख्य पद)- उपवसं (प्रा.),जुन्नर,पुणे वनवृत्त यांची सहायक वनसंरक्षक (वन्यजीव),वन्यजीव विभाग,छत्रपती संभाजीनगर.
५. भारथ प्रदीव डी,सवसं (अधिसंख्य पद)उपवसं (प्रा.),पश्चिम नाशिक,नाशिक वनवृत्त यांची सहायक वनसंरक्षक(तांत्रिक),गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा येथे पदस्थापना करण्यात आली आहे.
- Advertisement -

