Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीभारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी..

भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकार आणि इस्त्राईल सरकार यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार,भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने ‘केअरगिव्हिंग’ (Caregiving)क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गडचिरोली येथील जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय(MSDE)आणि इस्त्राईलची ‘पॉप्युलेशन अँड इमिग्रेशन अथॉरिटी’ (PIBA)यांच्यात पाच अंमलबजावणी प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.बांधकाम (Construction), केअरगिव्हिंग, वाणिज्य व सेवा, रेस्टॉरंट आणि उत्पादन (Manufacturing).जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे ३,५०० होम-बेस्ड केअरगिव्हर्सची आवश्यकता आहे.यापैकी पहिल्या टप्प्यात ३५० केअरगिव्हर्सची निवड १ जून २०२६ पर्यंत केली जाणार आहे.ही निवड प्रक्रिया नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(NSDC)द्वारे राज्य कौशल्य विकास विभाग/मिशनच्या समन्वयाने पार पडणार असून उमेदवारांचे योग्य स्क्रीनिंग केले जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी रोजगाराच्या सविस्तर माहितीसाठी आणि अर्जासाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी maharashtrainternational.com/jobDetail.aspx ज्या उमेदवारांना अधिक माहिती  हवी आहे, त्यांनी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.-२,युनिट क्रमांक-२ कॉम्प्लेक्स,पोलीस मुख्यालयासमोर, गडचिरोली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!