उद्रेक न्युज वृत्त :- भारतात अशीही एक शाळा आहे की,जगामध्ये सर्वात मोठी शाळा म्हणून तिची ख्याती आहे.६४ वर्षांपूर्वी केवळ ५ विद्यार्थ्यांसह सुरू करण्यात आलेल्या शाळेत आता जवळपास ५८,००० विद्यार्थी पूर्व प्राथमिक,प्राथमिक,कनिष्ठ आणि इतर भागात सुरू आहे.भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश असून उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील सिटी मॉन्टेसरी स्कूल (सीएमएस) नावाची जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते.१९५९ मध्ये जगदीश गांधी यांनी शाळेची स्थापना केली होती.शाळेमध्ये शिक्षक,सहाय्यक कर्मचारी,सफाई कामगार,रिक्षाचालक, इलेक्त्रिशियन,सुतार,माळी यांच्या समवेत एकूण ४५०० कर्मचारी कार्यरत आहेत.
संपूर्ण शहरात पसरलेल्या २० कॅम्पससह शाळेत १००० पेक्षा जास्त वर्गखोल्या आणि ३७०० संगणक आहेत.जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे काम नाही; परंतु सिटी मॉन्टेसरी यांनी करून दाखविले आहे.’जगातील सर्वात मोठी शाळा’ म्हणून या शाळेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.