- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा मार्गावरील जामठाजवळील गवसी-मानापूर गावादरम्यान काल शनिवारच्या रात्री सात वाजेच्या सुमारास घडली.योगेश नाईक वय ३६ वर्षे, त्यांची पत्नी सुनीता योगेश नाईक आणि मुलगा गुलशन ऊर्फ गोलू योगेश नाईक वय ४ वर्षे अशी मृतांची नावे असून तन्मय नाईक वय ६ वर्षे असे गंभीर जखमी असलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.योगेश नाईक हे मूळचे बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील रहिवासी होते.ते नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीत काम करीत होते.
योगेश नाईक हे एमएच ४० सीडब्ल्यू ५०६७ क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी आणि दोन मुलांसह नागपूरहून बुटीबोरीकडे जात होते.जात असतांनाच रात्रीच्या सुमारास एचआर ५५ एएक्स ८२७८ क्रमांकाचा ट्रेलर वर्धा मार्गावरील जामठानजीकच्या गवसी-मानापूरजवळ भरधाव वेगात आला आणि त्याने नाईक यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की योगेश,सुनीता आणि गुलशन यांचा जागीच मृत्यू झाला.तर तन्मय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार प्रमोद घोंगे पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.अपघात घडताच चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
- Advertisement -

