Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीभंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाची फाईल अडकली महसूल विभागाच्या टेबलावरच..

भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाची फाईल अडकली महसूल विभागाच्या टेबलावरच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाने मागील वर्षी भंडारा ते गडचिरोलीपर्यंत समृद्धी महामार्ग होईल,अशी घोषणा  केली होती.त्यानुसार सर्वेक्षणही करण्यात आले व सदर मार्ग कुठून जाणार हे निश्चितही करण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यासह लाखांदूर,आरमोरी व ब्रह्मपुरी तालुक्यापर्यंत पोहोचेल. येथील सर्वेक्षणानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात सिमेंटचे दगडही उभारण्यात आले.मात्र, कोणत्याही सूचना महसूल विभागाला प्राप्त झाल्या नाहीत.या मार्गाचे काम पुढे जाऊ शकले नाही.आता सरकार सत्तारूढ झाल्यावर यासंदर्भात हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई हे राज्याचे पश्चिमेकडील,तर गडचिरोली हे राज्याचे सर्वांत पूर्वेकडील टोक आहे.दोन्ही टोक जोडण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली. विदर्भात नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचला आहे.पुढे त्याच्या विस्तार भंडाऱ्यापर्यंत व तेथून त्याचा विस्तार गडचिरोलीपर्यंत करण्याची घोषणा राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच या मार्गाच्या सर्वेक्षण कामाला सुरुवात करण्यात आली. मार्ग कोणत्या गावावरून जाईल व कोणत्या शेतकऱ्याची जमीन जाईल,हे निश्चित करण्यात आले आहे.त्यावरून या मार्गाच्या आराखडा तयार करण्यात आला आहे.त्यानंतर मात्र जमीन हस्तांतरण करण्याबाबत कोणत्याही सूचना महसूल विभागाला प्राप्त झाल्या नाहीत.त्यामुळे अजूनपर्यंत त्यांची प्रक्रिया पुढे गेलेली नाही.यामुळे या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षांचा कालावधी लागेल? असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!