- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-चोरी ही चोरीच असते,ती आवडणारी असो वा न आवडणारी.हल्ली अल्पवयीनांवर हेरोपंतीचे भूत ओढवले आहे.असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरात उघडकीस आला.बुलेट दुचाकी शानदार आहे.रस्त्यावरून नेतांना सारेच चालविणाऱ्याकडे पाहतात,त्यामुळे आम्ही बुलेट चोरली; अशी कबुली दोन अल्पवयीन मुलांनी पोलिसांकडे दिली.त्यांच्या या कबुलीने पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसल्याची घटना काल,शुक्रवारी २९ नोव्हेंबरला शहरात उघडकीस आली.
ब्रम्हपुरीतील गुजरी वॉर्डातील आसिफ अली जेसानी यांनी आपल्या घरासमोर एम.एच.२७ डी.डी ४०६० क्रमांकाची बुलेट दुचाकी उभी ठेवली होती.याच महिन्याच्या १५ दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी बुलेट दुचाकी चोरून नेली.त्यामुळे वाहनधारकाने मित्रमंडळी व नातेवाइकांकडे चौकशी केली.मात्र, कुठेही शोध न लागल्याने शेवटी ब्रम्हपुरी
ठाण्यात तक्रार दाखल केली.शिवाय घराला लावलेल्या सीसीटीव्हीची चौकशी करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली.त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ५५२/२४ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.त्यानंतर पोलिसांनी तपासला सुरुवात केली.पोलिसांनी तक्रारदार आसिफ अली जेसानी यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.तेव्हा अंगणात ठेवलेली बुलेट दुचाकी दोन मुलांनी चोरून नेत असल्याचे आढळून आले.त्यावरून आवळगाव येथील दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले.चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.मात्र,बुलेट चालविण्यासाठी खूप आवडते म्हणून चोरल्याचे त्यांनी सांगितले.अल्पवयीन मुलांकडून चोरीची बुलेट व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींची बालसुधारगृहात रवानगी झाली.सदर घटनेप्रकरणी कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले,सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज खडसे,योगेश शिवणकर,मुकेश गजबे,संदेश देवगडे, अजय कटाईत,निलेश तुमसरे आदींनी केली.
- Advertisement -