Tuesday, March 25, 2025
Homeगडचिरोलीबारावी,दहावी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये; यासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू...- काय...
spot_img

बारावी,दहावी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये; यासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू…- काय आहे १४४ कलम; घ्या जाणून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १२ वी २१ फरवरी ते २१ मार्च २०२३ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत.परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे.जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ चे कलम १४४ अन्वये  प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या १०० मिटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ चे कलम १४४  

परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही.  परिक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही.१०० मिटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन,सायबर कॅफे, झेरॉक्स सेंटर,फॅक्स केंद्र,पानपट्टी,टायपिंग सेंटर,एस टी डी बुथ,ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद राहतील.परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन,फॅक्स,ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस,वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधीत ध्वनी प्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये. 

सदर आदेश परिक्षा केंद्रांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी,देखरेख करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही. तसेच हे आदेश २१ फरवरी ते २५ मार्च २०२३ रोजी  पर्यत  परिक्षा सुरु होण्याचे १ तास अगोदर व परीक्षा संपल्यानंतर १ तासा पर्यंत परीक्षेच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व संबंधित परीक्षा केंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!