Friday, July 17, 2026
Homeगोंदियाबापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर बरीचशी कुत्रे ही हल्ला चढवून एखाद्याचा जीव घेतांना दिसून येतात.प्रकरणी काही शहरातील घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.अश्यातच नुकतेच गोंदिया शहरात एका सात वर्षीय चिमुकलीवर चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी अचानकपणे हल्ला चढवून तिला तीडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सदरचा घडलेला संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घरा शेजाऱ्याने वेळीच धाव घेतल्याने चिमुकलीचा जीव वाचला खरी,पण झालेल्या हल्ल्याने चिमुकली प्रचंड मानसिक दहशतीखाली गेली.सदरची घटना गोंदिया शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील रिंग रोडवरील मजारच्या पाठीमागे सकाळी घडली.सात वर्षाची चिमुकली शाळेत जाण्यासाठी आपल्या घराबाहेर उभी होती.याचवेळी अचानकपणे एका गल्लीतून आलेल्या एका मोकाट कुत्र्याने तिच्यावर भूंकायला सुरुवात केली व हल्ला चढवला.दरम्यान,चार ते पाच कुत्रे एकत्र येत चिमुकलीवर तुटून पडले.कुत्र्यांनी अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली आणि तिने जिवाच्या आकांताने किंचाळायला सुरुवात केली.तिचा आवाज ऐकताच घरा शेजाऱ्यांनी कुत्र्यांना हाकलून लावत चिमुकलीची सुटका केली.शेजाऱ्याच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.मात्र,थोडाफार उशीर झाला असता, तर मुलीच्या जीवाला गंभीर धोका होण्याची शक्यता नाकारता आली नसती.हल्ल्यात सुदैवाने चिमुकली थोडक्यात बचावली असून घटनेनंतर मुलीला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
  • व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!