- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे
संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज,बुधवार २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम,तर काही भागांत मध्यम ते मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.उद्या,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी नागपूर, यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर शुक्रवार २५ सप्टेंबरला परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.दरम्यान,काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत आहे.त्यामुळे आज २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या काळात अनेक भागांत अचानक उद्भवणाऱ्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची शक्यता आहे.पाऊस कोसळला तर पिकांसाठी दिलासा देणारा ठरण्याची शक्यता आहे.मात्र,अतिवृष्टी,वीज पडणे आणि वादळी वाऱ्याचा धोका लक्षात घेता शेतकरी बांधवांनी पावसादरम्यान शेतात जाणे टाळून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- Advertisement -

