Friday, June 19, 2026
Homeमुंबईबच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा ‘रॉबिनहूड’ नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी बच्चू कडू यांच्यासोबत प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत होती.आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.काल बुधवारच्या रात्री मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत पक्ष विलीनीकरण,तसेच भविष्यातील राजकीय भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली.विशेष म्हणजे, ‘प्रहार’चा राजकीय पक्ष शिवसेनेत विलीन झाला असला तरीही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रहार’ संघटना मात्र स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.बच्चू कडू म्हणाले,आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी हाती घेतला आहे.काल परवा ज्या चर्चा झाल्या,आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे रोजगार हमी योजनेत घ्यावे,हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे.लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत.शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले,मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही.हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत,अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली. ‘प्रहार’ संघटनेकडून नेहमी सामाजिक कार्य सुरू असते.अमरावती जिल्ह्यातला अचलपूल विधानसभा मतदार संघ त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून ओळखला जातो.बच्चू कडू यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू असून अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दिव्यांग,अंध आणि अपंगांसाठी त्यांनी केलेले काम आणि वेगवेगळ्या धाटणीचे आंदोलने कायम चर्चेत असतात.त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काही काळ राज्यमंत्री म्हणून काम केले.विशेष म्हणजे,आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.भाजपसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.अश्यातच आता एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेचे दोन उमेदवार घोषित केले आहेत.एक बच्चू कडू आणि दुसरे म्हणजे डॉ.नीलम गोऱ्हे यांची घोषणा करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!