Tuesday, June 16, 2026
HomeUncategorizedबँकेतील कर्मचारी एकाच वेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत...-जाणून घ्या आपले अधिकार

बँकेतील कर्मचारी एकाच वेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत…-जाणून घ्या आपले अधिकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

एखादा बैंक कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली तुमचे काम ताटकळून ठेवतअसेल, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध बँकेतील तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवू शकता.त्याची दखल घेतली जात नसेल तर व्यवस्थापक, नोडल अधिकाऱ्यांकडेही तक्रार करता येते. शिवाय, प्रत्येक बँकेत निवारण मंच असतात. या मंचाचा फोन नंबर, ई-मेल आयडी तुम्ही बँकेकडून मिळवू शकता. 

बँकेच्या ‘कस्टमर केअर’ला कॉल करून हा नंबर मिळवता येऊ शकतो.बँकेने महिनाभरापर्यंत तक्रारीची दखल न घेतल्यास बँकिंग लोकपालांकडे अपिलात जाता येते.कुठलीही बँक अगर त्या बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली ग्राहकांना ताटकळत ठेवू शकत नाहीत. माहितीच्या अधिकारात स्वतः रिझर्व्ह बँकेने ही माहिती सार्वजनिक केली आहे.बँकेतील कर्मचारी एकाचवेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत.एकेकाने सोयीनुसार अशी सुट्टी घ्यावयाची असते. बँकेच्या कामकाजाच्या एकूण संपूर्ण वेळात सामान्य व्यवहार हा सुरूच राहिला पाहिजे. 

कर्ज नाकारण्याचे कारण द्या-

तुमच्या कर्जाचा अर्ज कारण नमूद केल्याशिवाय बँक रद्द करू शकत नाही.तसे बँकेने केल्यास तुम्ही तक्रार करू शकता.

हेही जाणून घ्या….

बँकेकडून ‘चेक कलेक्शन’मध्ये विलंब झाल्यास बँकेला ग्राहकास भरपाई द्यावी लागेल.खात्यात बॅलन्स नसल्याने ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस) फेल झाल्यास ग्राहक म्हणून तुम्हाला दंड भरावा लागेल. तुम्ही देशातील कुठल्याही बँकेत फाटक्या, जुन्या नोटा बदलू शकता. कुठलीही बँक तुम्हाला त्यासाठी नकार देऊ शकत नाही. तुमच्याकडून दिल्या गेलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस इन्स्ट्रक्शन्स मध्ये बँकेकडून विलंब झाल्यासही ग्राहक म्हणून तुम्हाला भरपाई मिळेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!