उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या परिस्थितीत असा एकही व्यक्ती सापडणार नाही की,ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही.लहानांपासून तर वयोवृद्ध यांची बँक खाती असतातच.बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित मानले जाते. काबाळकष्ट करून व पोटाची आतडी मारून लोक बँकेत पैसा ठेवतात.अशातच काहीजण बँकेत तर पैसा ठेवतात; मात्र त्यांना माहितीच नसते किंवा आठवण येते किंवा नाही की,आपला बँकेत पैसा आहे.कितीतरी वर्षे उलटूनही काहीजण ठेवलेल्या पैशाला हात लावत नाही.अशीच बाब निदर्शनास आली असून नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम ३५ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फेब्रुवारी मध्ये दिली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी संसदेत दिली आहे.
खरे म्हणजे असे पैसे ज्यांच्यावर कुणीही दावा केलेला नाही.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला लिखित स्वरुपात ही माहिती दिली.सदर ३५,०१२ कोटी रुपयांचा कोणीही दावेदार नसलेली सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेत आहे.स्टेट बँक ऑफ इंडियात असे ८,०८६ कोटी रुपये आहेत.तर पंजाब नॅशनल बँकेत असे ५,३४० कोटी रुपये आहेत. कोणीच दावा न केलेले ४,५५८ कोटी रुपये कॅनरा बँकेमध्ये आहेत तर बाकीची. रक्कम इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बचत आणि चालू खात्यात असलेल्या रकमेबद्दल १० वर्षे कोणीही विचारणा न केल्यास ती रक्कम ‘दावा न केलेली रक्कम’ मानली जाते. अनेक जण बँकेत ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतात. त्याला मुदत ठेव मानले जाते.ठराविक कालावधी संपल्यानंतर १० वर्षांनंतरही त्या रकमेवर दावा करण्यास कोणीही पुढे न आल्यास त्या रकमेला ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ समजले जाते.सदर रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयनेस फंडा’त जमा केली जाते.