Thursday, July 9, 2026
Homeनागपूरफरार आरोपींवर 'लुकआउट सर्क्युलर' नंतर मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू.. - स्फोटके बनवणाऱ्या...

फरार आरोपींवर ‘लुकआउट सर्क्युलर’ नंतर मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू.. – स्फोटके बनवणाऱ्या कंपनीतील स्फोट प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.एसबीएल कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर कंपनीचे संचालक आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत.यात एसबीएल कंपनीचे मालक तथा अध्यक्ष संजय चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक चौधरी तसेच रवींद्र पोखर्णा,श्रवण कुमार, सत्यवती पराशर, आलोक अवधिया,मनोज कुमार प्रसाद,मितिन चंदनमल,अतुल गुप्ता आणि केदार पंचपुत्रे यांना अद्याप अटक झालेली नाही.या सर्व आरोपींविरुद्ध यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून,त्यांना ‘फरार गुन्हेगार’ घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यातच,त्यांच्या विरोधात ‘लुकआउट सर्क्युलर’ जारी करण्यात आले असून त्यांना देशाबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.या प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीतील विविध पदांवरील अधिकारी समाविष्ट आहेत.अश्यातच मुख्य आरोपींना ‘फरार’ घोषित करण्याची तयारी नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे.त्याचबरोबर,फरार आरोपी शरण आले नाहीत,तर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,तपासादरम्यान कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ‘पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था’ तसेच ‘औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय’ यांच्या अहवालांत सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.कारखान्यात स्फोटके दीर्घकाळ साठवून ठेवण्यात आली होती.तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण न देताच धोकादायक कामे करवून घेतली जात होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!