Saturday, June 20, 2026
Homeबुलढाणाप्रेयसीच्या विरहात दारूच्या आहारी जाऊन २५ वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल.. -...

प्रेयसीच्या विरहात दारूच्या आहारी जाऊन २५ वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल.. – इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रेयसीचे गाणे लावत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बुलढाणा :-विवाहित युवकाचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले.अशातच प्रेयसी घर सोडून गेल्याने प्रेयसीच्या विरहात दारूच्या आहारी जाऊन २५ वर्षीय युवकाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रेयसीचे गाणे लावत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथे १९ मार्च रोजी घडली असून आज,शुक्रवार २१ मार्च रोजी सर्वत्र उघडकीस आली. समाधान लक्ष्मण आटोळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
समाधान आटोळे याचा दोन वर्षापूर्वी साक्षी नावाच्या युवती सोबत विवाह झाला होता.अशातच
मागील काही दिवसांपासून समाधानचे गावातीलच,(केशवशिवनी तालुका सिंदखेडराजा) येथील युवती सोबत प्रेमसंबंध जुळले.पत्नी व प्रेयसीसह समाधान आटोळे हा वेगळा राहू लागला.अशातच १३ मार्च रोजी संध्याकाळी प्रेयसी कुणालाही काहीही न सांगता घरातून अचानक निघून गेल्याने समाधान हा दारूच्या आहारी गेला.१९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता, केशवशिवनी दुसरबीड रस्त्यावर समाधान बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.रुग्णवाहिका मालक राम दराडे यांनी त्याचे वडील लक्ष्मण आटोळे यांना ही माहिती दिली.वडील लक्ष्मण आटोळे व आई विजयामाला आटोळे यांनी सदर ठिकाणी जाऊन त्याला तात्काळ रुग्णवाहिकेने सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आपल्या मुलाची प्रेयसी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने माझा मुलगा दारूच्या आहारी गेला आणि विरह सहन न झाल्याने विषारी औषध पिऊन त्याने आत्महत्या केली असे वडील लक्ष्मण आटोळे यांच्या तोंडी माहितीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!