Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीप्रमिला आणि अखिला ने केले गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण…गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील दोन्ही...

प्रमिला आणि अखिला ने केले गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण…गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील दोन्ही महिला नक्षली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यातील काही नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून स्वाभिमानाचे जीवन जगणे पसंत केले असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर फोफावला होता.हिंसक कारवाया,जाळपोळ,हत्या,गोळीबार व इतर अनेक घटना दररोज सगळीकडे उघडकीस येत होत्या. मात्र,मागील काही वर्षांपासून अनेक नक्षलींनी आत्मसमर्पण केले आहे.अशातच आता सुमारे १६ लाखाचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षली महिलांनी आज,गुरूवारी दिनांक-११ जुलै रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई वय ३६ वर्षे आणि अखिला संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती वय ३४ अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत.

प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई ही धानोरा तालुक्यातील बोगाटोला येथील रहिवासी आहे.२००५ मध्ये ती टिपागड दलमची सदस्य झाली.२०११ पर्यंत ती तेथे कार्यरत होती.पुढे २०१४ पर्यंत वैरागड दलम आणि त्यानंतर केकेडी दलममध्ये काम केले.२०१५ मध्ये कंपनी क्रमांक ४ मध्ये तिची बदली झाली.पुढे २०१८ मध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाल्यानंतर २०२१ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. २०२२ मध्ये दंडकारण्य सप्लाय टीममध्ये बदली होऊन आजतागायत ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.तिच्यावर चकमकीचे २०, जाळपोळीचे २ आणि अन्य १८ असे एकूण ४० गुन्हे दाखल आहेत.शासनाने तिच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अखिला पुडो ही धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील रहिवासी आहे.२०१० मध्ये ती टिपागड दलममध्ये सहभागी झाली.२०१४ मध्ये ती प्लाटून क्रमांक १५ आणि त्यानंतर कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य झाली.२०१५ मध्ये ती दंडकारण्य सप्लाय टीमची सदस्य झाली.२०१८ पासून ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य झाली आणि आजतागायत कार्यरत होती.तिच्यावर चकमकीचे २,खुनाचे ४ आणि अन्य १ असे एकूण ७ गुन्हे दाखल असून,राज्य शासनाने ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!