Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीप्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत ३६ हजाराच्यावर घरकुलांना मंजुरी.. - उद्याला...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत ३६ हजाराच्यावर घरकुलांना मंजुरी.. – उद्याला लाभार्थ्यांना प्रथम हप्ता होणार वितरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाआवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ मधील लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण सोहळा उद्या शनिवार २२ फेब्रुवारीला उत्सव स्वरूपात साजरा होणार आहे.या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री उपस्थित राहणार आहेत.राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम बालेवाडी,पुणे येथून थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आणि पंचायत समितींना दाखवले जाणार आहे.गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ३६,०७० लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आली असून १५ हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत केला जाणार आहे.सदरचा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार असून जिल्ह्यातील सर्व लाभार्थी,ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास  उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!