Thursday, September 17, 2026
Homeनागपूरपोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका पोलीस हवालदारास तब्बल ४० हजाराची लाच घेतांना नागपूरच्या एसीबी पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.सचिन तायडे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव असून ते नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. सदरची कारवाई जरीपटका पोलिस ठाण्याच्या आवारातच करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सचिन तायडे यांनी प्रकरणातील तक्रारदारास ५० हजार रुपयांची लाच मागितली.तडजोडीअंती ४० हजाराची मागणी केली.लाच दिली नाही तर साहेबांना राग येईल,अशीही बतावणी केली.पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखविण्यात आल्याने तक्रारदाराने ४० हजारांत फायनल केले.मात्र,तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तायडे यांनी तक्रारदारास पोलिस ठाण्यात बोलावले.त्यामुळे एसीबीने पोलिस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचला.काल बुधवारच्या रात्री ८ वाजता तायडेने ४० हजारांची लाच घेताच एसीबीच्या पथकाने तायडे यांना जेरबंद केले. विशेष म्हणजे,प्रकरणातील तक्रारदार यांचे पोलीस ठाण्यातील प्रकरण मिटविण्यासाठी ५० हजार तर अदखलपात्र गुन्हा(एनसी)दाखल न करण्यासाठी ४० हजार रुपये मागण्यात आले होते.४० हजारांत प्रकरण मिटविण्याचे ठरलेले असतांनाच गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारदारास मिळाल्याने सदरचे प्रकरण थेट एसीबीकडे पोहोचल्याची चर्चा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली...

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!