उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नागपुर शहरात सदर घटना घडली असून इम्रान शेख असे आरोपीचे नाव आहे.
गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात इम्रान शेख वरती देवलापार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांना तो चकमा देत होता.नागपूर जिल्ह्यातील देवलापार मध्ये इमरान शेख नावाच्या व्यक्तीचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते.इम्रान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टर मध्ये असल्याची गुपित माहिती पोलिसांना मिळाली होती.सदर माहितीच्या आधारावरती पोलीस काल रविवारी म्हाडा क्वार्टर्स मध्ये पोहोचले.पोलीस आल्याचे दिसताच इम्रान शेख यांनी तिसऱ्या मजल्यावर उडी घेतली.घटनेत इम्रान गंभीर जखमी झाला होता.त्यामुळे त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज १३ फेब्रुवारीला सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान,या प्रकरणात इम्रान शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे इम्रान मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. इम्रानच्या नातेवाईकांच्या आरोपाची चौकशी केली जाईल; असे नागपूर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.