Wednesday, November 18, 2026
Homeपुणेपोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ही घटना आज,बुधवार ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. निलेश पाटील हे पुण्याच्या विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास औंध येथील नगरस रस्त्यावरील सुवर्णयोग सोसायटी मधील आपल्या राहत्या घरात त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान,वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.निलेश पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले,हे अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांचा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात.. -एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!